PIFF: १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘घुमा’ चित्रपटाची निवड
नगरच्या महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित चित्रपट,
१२ ते १९ जानेवारी दरम्यान महोत्सव
अहमदनगर – महाराष्ट्र सरकार व पुणे फिल्म फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणा-या पुणे आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवासाठी महेश काळे लिखित व दिग्दर्शित ‘घुमा’ या चित्रपटाची निवड झाली आहे. ग्रामीण भागात होणा-या बदलांवर भाष्य करणा-या ‘घुमा’ या चित्रपटाचा मराठी विभागात निवड झाली असून स्पर्धेसाठी स्पर्धेमध्ये एकूण सात चित्रपटांचा समावेश आहे. यंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असून १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये पार पडणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खडकी येथील शेतकरी कुटुंबातील दिग्दर्शक असून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. ग्रामीण भागात होणा-या बदलांवर घुमा चित्रपटातून भाष्य करणात आले आहे. मास फिल्म प्रोडक्शनचे निर्माते मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, संतोष इंगळे, सारंग बारस्कर तसेच ड्रीम सेलर फिल्मसचे रावसाहेब काळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
नगर तालुक्यातील खडकी या गावात सुरु झालेले चित्रिकरण सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, वाळकी व पारनेर येथे पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश रावसाहेब काळे याने केले आहे. छायाचित्रण योगेश कोळी आणि ध्वनिमुद्रण राशि बुट्टे यांनी केले आहे. चित्रपटामध्ये स्थानिक नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे.
दिग्दर्शक महेश काळे यांना भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या दुस-या विद्यार्थी राष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोलकातामध्ये ‘रुपया’ या लघुपटास सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले होते.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुण्यातील विविध ठिकाणी महोत्सव पार पडणार आहे. यामध्ये जगातील तसेच भारतातील नावाजलेले चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. जागतिक चित्रपटाच्या स्पर्धत १४ , देशविदेशमध्ये १३ तर अँनिमेशनमध्ये १६ चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ज्युरी फिल्म, ग्लोबल सिनेमा, फ्रान्स, अर्जेंटिना, व्हिएतनाम, आशियातील चित्रपट, सामाजिक प्रश्नावर आधारीत चित्रपट दाखविले जाणारआहेत. पुणयातील सिटिप्राईड कोथरुड, डेक्कन सातारा रोड, मंगला मल्टिप्लेक्स, नँशनल फिल्म आर्काव्ह आफ इंडिया, आयनॉक्स व कार्नेवल सिनेमा या ठिकाणी नावाजलेले तसेच स्पर्धेतील चित्रपट पाहाता येणार आहेत.
फँन्ड्री, ख्वाडानंतर घुमाची निवड:
प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पहिल्या चित्रपट फँण्ड्री यासही २०१४ मध्ये १२ व्या या महोत्सवात निवड झाली होती. तसेत या स्पर्धेत फँण्ड्रीने तब्बल तीन पारितोषिक पटकावली होती. त्यामध्ये नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिगर्शक, सोमनाथ अवघडे यास सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट कँमेरामन म्हणून विक्रम अमलाडी यांना गौरविण्यात आले होते.त्यानंतर २०१५ मध्ये १३ व्या महोत्सवात भाऊराव क-हाडे यांच्या ख्वाडा चित्रपटास नामांकन मिळाले होते. तसेच या चित्रपटासाठी भाऊराव क-हाडे यांना पहिला सर्वोत्कष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाला होता. नागराज मंजुळे, भाऊराव क-हाडे हे न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स चे विद्यार्थी असून महेश काळे हाही कॉलेजचा विद्यार्थी आहे.
मराठी चित्रपट स्पर्धेत या सात चित्रपटांचा समावेश:
मराठी चित्रपट विभागातील स्पर्धेमध्ये घुमा चित्रपटासह सात चित्रपटांचा समावेश आहे. त्यामध्ये अनंत महादेवन दिगर्शित डॉक्टर रखमाबाई, मंगेश जोशी दिग्दर्शित लथे जोशी , राजेश मापुसकर दिग्दर्शित वेंटिलेटर, अपुर्व साठे दिग्दर्शित एक ते चार बंद, संदिप पाटील दिग्दर्शित दशक्रिया, संदिप सावंत दिग्दशित नदी वाहेत सह महेश रावसाहेब काळे घुमा या चित्रपटांचा समावेश आहे. या विभागातील स्पर्धेत विविध पुरस्कार देण्यात येतात.
http://www.deshdoot.com/?p=4548146
http://www.deshdoot.com/?p=4548146
No comments:
Post a Comment