Thursday, 19 January 2017

प्रेक्षकांकडून घुमालाच पसंती


प्रेक्षकांकडून घुमालाच पसंती

पुणे, १९ जानेवारी, (हिं. स.) : पुणे फिल्मफाऊंडेशन व राज्य सरकार यांच्या वतीने दरवर्षी पार पडणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(पिफ) महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित घुमा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसतीस उतरला. पंधराव्या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड घुमाने पटकावला.फेस्टिव्हलचे अध्यक्ष जब्बार पटेल व चित्रपट अभ्यासक समर नखाते व परिक्षकांनी महेश काळे यास पुरस्काराने गौरविले.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार लेथ जोशी चित्रपटाने पटकावला. पिफमधील प्रेक्षकांसहीत परीक्षकांचीही मने जिंकणा-या घुमाचे लेखन व दिग्दर्शन महेश काळे यांनी केले आहे.
मास फिल्म प्रॉडक्शनचे मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सांरग बासस्कर , संतोष इंगळे व ड्रिम सेलर फिल्म्सचे रावसाहेब काळे यांनी घुमाची निर्मिती केली आहे. यंदाचं पिफचं हे पंधरावे यावर्षी मराठी चित्रपटाच्या विभागातही चुरशीची स्पर्धा होती. या स्पर्धेत प्रेक्षकांची मने घुमाने जिंकली. आपल्या पसंतीचा कौल देत प्रेक्षकांनीही घुमाचीच निवड केली. यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या विभागामध्ये एकूण सात चित्रपटांचा समावेश होता. राजेश मापुसकर दिग्दर्शित वेंटिलेटर, संदीप सावंत नदी वाहते, संदीप पाटील दिग्दर्शित दशक्रिया, अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित डॉक्टर रखमाबाई, अपुर्व साठे दिग्दर्शित, मंगेश जोशी दिग्दर्शित लेथ जोशी या चित्रपटांचा समावेश होता. पिफमध्ये झालेल्या कोथरुडमधील सिटी प्राईड व कँम्प येथील ऑयनॉक्सच्या दोन्ही शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. घुमामधील रेखाटलेली वास्तवता प्रेक्षकांना आपलीशी करुन गेली.पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध सिनेमागृहांमध्ये १२ तो १९जानेवारी दरम्यान हा फेस्टिव्हल पार पडला
घुमा हा माझा पहिलाच चित्रपट आहे. सर्व नवीन कलाकारांनाघेऊन चित्रपट तयार केलाय. पिफमध्ये प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे भारावून गेलो होतो. फेस्टिवलदरम्यान घुमाप्रेक्षकांना आवडला. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रेक्षकांच्या पुरस्कारामुळे मनस्वी आनंद होतोय. भविष्यात नक्कीच प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपटास दाद देतील, असे दिग्दर्शक महेश काळेयांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गांवकर

No comments:

Post a Comment