http://abpmajha.abplive.in/movies/ghuma-won-the-best-film-audience-choice-award-at-15th-pune-international-film-festival-347578
पुणे : पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकार यांच्या वतीने दरवर्षी पार पडणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित घुमा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पंधराव्या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड ‘घुमा’ने पटकावला. फेस्टिव्हलचे अध्यक्ष जब्बार पटेल व चित्रपट अभ्यासक समर नखाते व परिक्षकांनी महेश काळे यास पुरस्काराने गौरवले. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार लेथ जोशी चित्रपटाने पटकावला.
'पिफ'मध्ये महेश काळेंच्या 'घुमा'ला
ऑडियन्स चॉईस अवॉर्ड
पुणे : पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकार यांच्या वतीने दरवर्षी पार पडणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित घुमा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पंधराव्या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड ‘घुमा’ने पटकावला. फेस्टिव्हलचे अध्यक्ष जब्बार पटेल व चित्रपट अभ्यासक समर नखाते व परिक्षकांनी महेश काळे यास पुरस्काराने गौरवले. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार लेथ जोशी चित्रपटाने पटकावला.
‘पिफ’मधील प्रेक्षकांसहीत परीक्षकांचीही मने जिंकणाऱ्या घुमाचे लेखन व दिग्दर्शन महेश काळे यांनी केले आहे.
मास फिल्म प्रॉडक्शनचे मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सांरग बासस्कर, संतोष इंगळे व
ड्रिम सेलर फिल्म्सचे रावसाहेब काळे यांनी ‘घुमा’ची निर्मिती केली आहे.

‘घुमा’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. सर्व नवीन कलाकारांना घेऊन चित्रपट तयार केलाय.
‘पिफ’मध्ये प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे भारावून गेलो होतो. फेस्टिव्हलदरम्यान ‘घुमा’ प्रेक्षकांना
आवडला. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रेक्षकांच्या पुरस्कारामुळे मनस्वी आनंद होतोय.
भविष्यात नक्कीच प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपटास दाद देतील,
अशा भावना दिग्दर्शक महेश काळे यांनी व्यक्त केल्या.

यंदाचं पिफचं हे पंधरावे यावर्षी मराठी चित्रपटाच्या विभागातही चुरशीची स्पर्धा होती.
या स्पर्धेत प्रेक्षकांची मने ‘घुमा’ने जिंकली.आपल्या पसंतीचा कौल देत प्रेक्षकांनीही
‘घुमा’चीच निवड केली. यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या विभागामध्ये एकूण सात चित्रपटांचा समावेश होता.
राजेश मापुसकर दिग्दर्शित वेंटिलेटर, संदीप सावंत नदी वाहते, संदीप पाटील दिग्दर्शित दशक्रिया,
अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित डॉक्टर रखमाबाई, अपुर्व साठे दिग्दर्शित,
मंगेश जोशी दिग्दर्शित लेथ जोशी या चित्रपटांचा समावेश होता.

पिफमध्ये झालेल्या कोथरुडमधील सिटी प्राईड व कँम्प येथील ऑयनॉक्सच्या दोन्ही शोला प्रेक्षकांनी
भरभरून प्रतिसाद दिला. घुमामधील रेखाटलेली वास्तवता प्रेक्षकांना आपलीशी करुन गेली.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध सिनेमागृहांमध्ये 12 ते 19 जानेवारी
दरम्यान हा फेस्टिव्हल पार पडला.