Monday, 2 October 2017
Thursday, 28 September 2017
Tuesday, 26 September 2017
Sunday, 24 September 2017
Saturday, 23 September 2017
Friday, 22 September 2017
लावणी : इंग्लिश शिकवून सोडा
मुंबई : घुमा या मराठी सिनेमात एक फक्कड लावणी ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे, यात इंग्लिश शिकवून सोडा ही लावणी असणार आहे. वैशाली जाधव यांच्यावर ही लावणी चित्रित करण्यात आली आहे, तर प्रियांका बर्वे यांनी ही लावणी गायली आहे. लावणी गुरू ठाकूर यांनी लिहिली आहे, तर संगीत ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं आहे. घुमा हा सिनेमा २९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.
Thursday, 21 September 2017
Ghuma_Official_Trailer 2017
आवरा लवकर... सोयरीकीचं कामहे व्हय..?
Ghuma_Official_Trailer
यंदाच्या दस-याला वनवा पेटणार
Ghuma_Official_Trailer
यंदाच्या दस-याला वनवा पेटणार
२९ सप्टेंबरपासून सर्वत्र..
#Ghuma_Releasingon_29th_September2017 #MassFilmsPresents Mahesh R Kale #SharadJadhav #PoonamChaudharyPatil #AdeshAware#PramodKasbe #TeshwaniVetal Ganesh Panpat Nandkishor Gore #Hemant_kadam Shashaank Darne Nana More #Rajkumar_Jarange#Guru_Thakur #Hrishikesh_Saurabh_Jasraj_Joshi Phulwa Khamkar #AjayGogavale Priyanka Barve Mugdha Hasabnis

Tuesday, 19 September 2017
Friday, 15 September 2017
Thursday, 14 September 2017
Wednesday, 30 August 2017
Saturday, 26 August 2017
Ghuma | Official Teaser #2 (2017) - Mahesh Ravsaheb Kale
पाहतां तुझे मुख..
सुखावले सुख ||
डोळियांची भूक..
न वजे माझ्या ||
#GhumaMarathiMovie #UpcomingMarathiFilm
#Teaser_02 #Mahesh_R_Kale
#ReleasingOn_06th_October_2017
सुखावले सुख ||
डोळियांची भूक..
न वजे माझ्या ||
#GhumaMarathiMovie #UpcomingMarathiFilm
#Teaser_02 #Mahesh_R_Kale
#ReleasingOn_06th_October_2017
Wednesday, 16 August 2017
Ghuma | Official Teaser #1 (2017) – Mahesh Ravsaheb Kale
Ghuma | Official Teaser #1 (2017) – Mahesh Ravsaheb Kale
Sunday, 13 August 2017
1st Teaser
तयार असतील उद्या आख्खे फेसबुक आणि व्हाट्स एप यूजर
कारण उद्या दुपारी २ वाजता येतोय घुमा चा पहिला टिजर..
#फास्ट_मधी_पटक्यास...... उद्याच
Wednesday, 19 July 2017
Tuesday, 18 July 2017
Tuesday, 9 May 2017
Monday, 24 April 2017
Sunday, 23 April 2017
#Ghuma_Film won 14 Nomination
#Ghuma_Film won 14 Nomination
१७ वा संस्कृती कला दर्पण २०१७ - घुमा फिल्म १४ नामांकने
१. सर्वोत्कृकष्टृ चित्रपट – घुमा
२. सर्वोत्कृकष्टृ कथा – महेश रावसाहेब काळे
३. सर्वोत्कृकष्टृ संवाद – महेश रावसाहेब काळे
४. सर्वोत्कृकष्टृ पटकथा – महेश रावसाहेब काळे
५. सर्वोत्कृकष्टृ दिग्दर्शक – महेश रावसाहेब काळे
६. सर्वोत्कृकष्टृ कला दिग्दर्शक - योगेश इंगळे, विनायक होजगे
७. सर्वोत्कृकष्टृ संकलन – अपूर्व साठे
८. सर्वोत्कृकष्टृ छायांकन – योगेश कोळी
९. सर्वोत्कृकष्टृ संगीत – ऋषीकेश दातार, जसराज जोशी, सौरभ भालेराव,
१०. सर्वोत्कृष्टल पार्श्वकगायिका – मुग्धा, हसबनीस
११. सर्वोत्कृष्टल अभिनेता – शरद जाधव
१२. सर्वोत्कृष्टल बालकलाकार – आदेश आवारे
१३. सर्वोत्कृष्टल सहाय्यक अभिनेत्री – तेशवाणी वेताळ
१४. सर्वोत्कृष्टल सहाय्यक अभिनेता – प्रमोद कसबे

Wednesday, 1 February 2017
विद्यार्थ्यांनी अनुभवला चित्रपट निर्मितीचा प्रवास January 31, 2017 7:28 pm
विद्यार्थ्यांनी अनुभवला चित्रपट निर्मितीचा प्रवास
January 31, 2017 7:28 pm
January 31, 2017 7:28 pm
दिग्दर्शक महेश काळे यांच्याशी पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संवाद
अहमदनगर : ग्रामीण भागातील असूनही चित्रपट बनविण्याचे स्वप्न कसे साध्य केले ? चित्रपट बनविताना काय अडचणी आल्या ? अडचणींवर मात करत चित्रपट कसा साकारला ?यासह विविध प्रश्नाच्या माध्यमातून कॉलेजिअन्सनी चित्रपट निर्मितीचा प्रवास अनुभवला. निमित्त होते हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील स्नेहसंमलेनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टीम घुमाशी विद्यार्थ्यांशी संवाद या कार्यक्रमाचे. मंगळवारी घुमा टीमने चित्रपटनिर्मितीच्या प्रवासाविषयी विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला. घुमा चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे, निर्माते मदन आढाव, आदिनाथ धायगुडे, सहाय्यक दिग्दर्शक विक्रम शंकपाळे, अविनाश मकासरे, कार्यकारी निर्माते मंगेश जोंधळे, व्यवस्थापक अजय थोरात, नाना मोरे, आदेश आवारे, प्रमोद कसबे या टीमशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, प्राचार्या डॉ. अमरजा रेखी, डॉ. स्मिता भुसे, संमेलन कार्याध्यक्ष डॉ. गिरीष कुलकर्णी, प्रसाद बेडेकर उपस्थित होते.
टीम घुमाशी संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. रुपया लघुपट का करावा वाटला ? घुमा चित्रपटाची कथा कशी सुचली ? निर्माते शोधण्याचा प्रवास कसा होता ? घुमा बनविताना काय अडचणी निर्माण झाल्या ? नवीन कलाकारांना घेउन चित्रपट निर्मितीचे आव्हान कसे पेलले ? विद्यार्थ्यांनी चित्रपट क्षेत्राकडे वळताना काय काळजी घ्यावी ? पिफमध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर काय वाटले ? अशा विविध प्रश्नांचा भडीमार संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी महेश काळे म्हणाले, चित्रपटाची निर्मिती करताना अनेक अडचणी येतात मात्र अडचणी सांगून सुटत नाहीत. प्रत्येक काम करताना अडचणी निर्माण होत असतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतला शोधावे लागते. विद्यार्थी असताना आपण शिक्षण घ्यायचे म्हणून घेतो. अनेकवेळा नोकरीच्या दृष्टीकोनातून पालक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. मुलाची आवड कशात आहेत याचा शोध घेतला जात नाही. मुलाची आवड शोधूनच पालकांनी शिक्षण देणे गरजेचे आहे. फोटोग्राफी करायची म्हणून मास कम्युनिकेशनला अँडमिशन घेतले. मास कम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमात लघुपट बनविणे अनिवार्य असते. ही आमच्यासाठी एक परीक्षाच असल्याने लघुपट बनविण्याशिवाय पर्याय नसतो. त्यादरम्यान रुपया नावाचा लघुपट बनविला. त्याला राष्ट्रिय पुरस्कार मिळाला. त्यानंतर घुमा चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले. गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेला घुमा पूर्ण झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट ऑडियन्स अँवार्ड मिळाल्याने आनंदात भर पडली. यश मिळण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मिळेल ते काम विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. या कामातून स्वतमधील कसब दाखवता आले पाहिजे. आज आपण आपली संस्कृती जपणे गरजेचे आहे. संस्कृती टिकली तरच आपले अस्तित्व टिकेल असेही काळे म्हणाले.
निर्माते मदन आढाव म्हणाले, चित्रपटाच्या प्रेमाने आम्हाला निर्मितीकडे खेचले. घुमाची चित्रपटाची कथा आवडल्याने माझ्या सहका-यांनी निर्मितीला होकार दिला. महेश काळे यांचा पहिलाच चित्रपट असल्याने मनामध्ये भिती होती. मात्र नगरमधील एका नवीन दिग्दर्शकाला आम्ही पाठींबा दिला. प्रेक्षकांच्याही पसंतीस आम्ही नक्कीच उतरु, असेही सांगितले.
कार्यक्रमाचे निवेदन गिरिष कुलकर्णी, मुग्धा मुळे व प्रसाद बेडेकर यांनी केले.
Monday, 23 January 2017
'पिफ'मध्ये महेश काळेंच्या 'घुमा'ला ऑडियन्स चॉईस अवॉर्ड
http://abpmajha.abplive.in/movies/ghuma-won-the-best-film-audience-choice-award-at-15th-pune-international-film-festival-347578
पुणे : पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकार यांच्या वतीने दरवर्षी पार पडणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित घुमा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पंधराव्या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड ‘घुमा’ने पटकावला. फेस्टिव्हलचे अध्यक्ष जब्बार पटेल व चित्रपट अभ्यासक समर नखाते व परिक्षकांनी महेश काळे यास पुरस्काराने गौरवले. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार लेथ जोशी चित्रपटाने पटकावला.
- Marathi News
- >
- Movies
- >
- 'पिफ'मध्ये महेश काळेंच्या 'घुमा'ला ऑडियन्स चॉईस अवॉर्ड
'पिफ'मध्ये महेश काळेंच्या 'घुमा'ला
ऑडियन्स चॉईस अवॉर्ड
पुणे : पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकार यांच्या वतीने दरवर्षी पार पडणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित घुमा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पंधराव्या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड ‘घुमा’ने पटकावला. फेस्टिव्हलचे अध्यक्ष जब्बार पटेल व चित्रपट अभ्यासक समर नखाते व परिक्षकांनी महेश काळे यास पुरस्काराने गौरवले. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार लेथ जोशी चित्रपटाने पटकावला.
‘पिफ’मधील प्रेक्षकांसहीत परीक्षकांचीही मने जिंकणाऱ्या घुमाचे लेखन व दिग्दर्शन महेश काळे यांनी केले आहे.
मास फिल्म प्रॉडक्शनचे मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सांरग बासस्कर, संतोष इंगळे व
ड्रिम सेलर फिल्म्सचे रावसाहेब काळे यांनी ‘घुमा’ची निर्मिती केली आहे.
मास फिल्म प्रॉडक्शनचे मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सांरग बासस्कर, संतोष इंगळे व
ड्रिम सेलर फिल्म्सचे रावसाहेब काळे यांनी ‘घुमा’ची निर्मिती केली आहे.
‘घुमा’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. सर्व नवीन कलाकारांना घेऊन चित्रपट तयार केलाय.
‘पिफ’मध्ये प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे भारावून गेलो होतो. फेस्टिव्हलदरम्यान ‘घुमा’ प्रेक्षकांना
आवडला. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रेक्षकांच्या पुरस्कारामुळे मनस्वी आनंद होतोय.
भविष्यात नक्कीच प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपटास दाद देतील,
अशा भावना दिग्दर्शक महेश काळे यांनी व्यक्त केल्या.

यंदाचं पिफचं हे पंधरावे यावर्षी मराठी चित्रपटाच्या विभागातही चुरशीची स्पर्धा होती.
या स्पर्धेत प्रेक्षकांची मने ‘घुमा’ने जिंकली.आपल्या पसंतीचा कौल देत प्रेक्षकांनीही
‘घुमा’चीच निवड केली. यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या विभागामध्ये एकूण सात चित्रपटांचा समावेश होता.
राजेश मापुसकर दिग्दर्शित वेंटिलेटर, संदीप सावंत नदी वाहते, संदीप पाटील दिग्दर्शित दशक्रिया,
अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित डॉक्टर रखमाबाई, अपुर्व साठे दिग्दर्शित,
मंगेश जोशी दिग्दर्शित लेथ जोशी या चित्रपटांचा समावेश होता.

पिफमध्ये झालेल्या कोथरुडमधील सिटी प्राईड व कँम्प येथील ऑयनॉक्सच्या दोन्ही शोला प्रेक्षकांनी
भरभरून प्रतिसाद दिला. घुमामधील रेखाटलेली वास्तवता प्रेक्षकांना आपलीशी करुन गेली.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध सिनेमागृहांमध्ये 12 ते 19 जानेवारी
दरम्यान हा फेस्टिव्हल पार पडला.
भरभरून प्रतिसाद दिला. घुमामधील रेखाटलेली वास्तवता प्रेक्षकांना आपलीशी करुन गेली.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध सिनेमागृहांमध्ये 12 ते 19 जानेवारी
दरम्यान हा फेस्टिव्हल पार पडला.
Sunday, 22 January 2017
Saturday, 21 January 2017
Thursday, 19 January 2017
Ghuma won the "Best Film Audience Choice Award"
Ghuma won the "Best Film Audience Choice Award" at 15th Pune International Film Festival in Marathi Film Competition...
Hipp Hippy hurreyyy...
प्रेक्षकांकडून घुमालाच पसंती
प्रेक्षकांकडून घुमालाच पसंती
पुणे, १९ जानेवारी, (हिं. स.) : पुणे फिल्मफाऊंडेशन व राज्य सरकार यांच्या वतीने दरवर्षी पार पडणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(पिफ) महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित घुमा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या पसतीस उतरला. पंधराव्या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड घुमाने पटकावला.फेस्टिव्हलचे अध्यक्ष जब्बार पटेल व चित्रपट अभ्यासक समर नखाते व परिक्षकांनी महेश काळे यास पुरस्काराने गौरविले.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा मानाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार लेथ जोशी चित्रपटाने पटकावला. पिफमधील प्रेक्षकांसहीत परीक्षकांचीही मने जिंकणा-या घुमाचे लेखन व दिग्दर्शन महेश काळे यांनी केले आहे.
मास फिल्म प्रॉडक्शनचे मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सांरग बासस्कर , संतोष इंगळे व ड्रिम सेलर फिल्म्सचे रावसाहेब काळे यांनी घुमाची निर्मिती केली आहे. यंदाचं पिफचं हे पंधरावे यावर्षी मराठी चित्रपटाच्या विभागातही चुरशीची स्पर्धा होती. या स्पर्धेत प्रेक्षकांची मने घुमाने जिंकली. आपल्या पसंतीचा कौल देत प्रेक्षकांनीही घुमाचीच निवड केली. यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या विभागामध्ये एकूण सात चित्रपटांचा समावेश होता. राजेश मापुसकर दिग्दर्शित वेंटिलेटर, संदीप सावंत नदी वाहते, संदीप पाटील दिग्दर्शित दशक्रिया, अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित डॉक्टर रखमाबाई, अपुर्व साठे दिग्दर्शित, मंगेश जोशी दिग्दर्शित लेथ जोशी या चित्रपटांचा समावेश होता. पिफमध्ये झालेल्या कोथरुडमधील सिटी प्राईड व कँम्प येथील ऑयनॉक्सच्या दोन्ही शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. घुमामधील रेखाटलेली वास्तवता प्रेक्षकांना आपलीशी करुन गेली.पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध सिनेमागृहांमध्ये १२ तो १९जानेवारी दरम्यान हा फेस्टिव्हल पार पडला
घुमा हा माझा पहिलाच चित्रपट आहे. सर्व नवीन कलाकारांनाघेऊन चित्रपट तयार केलाय. पिफमध्ये प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे भारावून गेलो होतो. फेस्टिवलदरम्यान घुमाप्रेक्षकांना आवडला. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रेक्षकांच्या पुरस्कारामुळे मनस्वी आनंद होतोय. भविष्यात नक्कीच प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपटास दाद देतील, असे दिग्दर्शक महेश काळेयांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गांवकर
Monday, 16 January 2017
Sunday, 15 January 2017
Friday, 13 January 2017
Thursday, 12 January 2017
Wednesday, 11 January 2017
Tuesday, 10 January 2017
HINDUSTAN SAMACHAR : 10/01/2017
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी घुमा चित्रपटाची निवड
मुंबई, १० जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्र सरकार व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महेश काळे लिखित व दिग्दर्शित घुमा या चित्रपटाची निवड झाली आहे. ग्रामीण भागात होणा-या बदलांवर भाष्य करणा-या घुमा या चित्रपटाचा मराठी विभागात निवड झाली असून स्पर्धेमध्ये एकूण सात चित्रपटांचा समावेश आहे. यंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असून १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये पार पडणार आहे.
महेश काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील खडकी येथील शेतकरी कुटुंबातील दिग असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ग्रामीण भागात होणा-या बदलांवर घुमा चित्रपटातून भाष्य करणात आले आहे.
मास फिल्म प्रोडक्शनचे निर्माते मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, संतोष इंगळे, सारंग बारस्कर तसेच ड्रीम सेलर फिल्मसचे रावसाहेब काळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नगर तालुक्यातील खडकी या गावात सुरु झालेले चित्रिकरण सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, वाळकी व पारनेर येथे पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश रावसाहेब काळे यांचेच आहे.
छायाचित्रण योगेश कोळी आणि ध्वनिमुद्रण राशि बुट्टे यांचे असून चित्रपटामध्ये स्थानिक नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे. दिग्दर्शक महेश काळे यांना भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या दुस-या विद्यार्थी राष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोलकातामध्ये रुपया या लघुपटाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले होते.पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुण्यातील विविध ठिकाणी महोत्सव पार पडणार आहे. यामध्ये जगातील तसेच भारतातील नावाजलेले चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. जागतिक चित्रपटाच्या स्पर्धत १४ , देशविदेशमध्ये १३ तर अँनिमेशनमध्ये १६ चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ज्युरी फिल्म, ग्लोबल सिनेमा, फ्रान्स, अर्जेंटिना, व्हिएतनाम, आशियातील चित्रपट, सामाजिक प्रश्नावर आधारीत चित्रपट दाखविले जाणारआहेत. पुणयातील सिटिप्राईड कोथरुड, डेक्कन सातारा रोड, मंगला मल्टिप्लेक्स, नँशनल फिल्म आर्काव्ह आफ इंडिया, आयनॉक्स व कार्नेवल सिनेमा या ठिकाणी नावाजलेले तसेच स्पर्धेतील चित्रपट पाहाता येणार आहेत.
फँन्ड्री, ख्वाडानंतर घुमाची निवड
प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पहिल्या चित्रपट फँण्ड्री यासहीत २०१४ मध्ये १२ व्या या महोत्सवात निवड झाली होती. तसेत या स्पर्धेत फँण्ड्रीने तब्बल तीन पारितोषिक पटकावली होती. त्यामध्ये नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिगर्शक, सोमनाथ अवघडे यास सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट कँमेरामन म्हणून विक्रम अमलाडी यांना गौरविण्यात आले होते.त्यानंतर २०१५ मध्ये १३ व्या महोत्सवात भाऊराव क-हाडे यांच्या ख्वाडा चित्रपटास नामांकन मिळाले होते. तसेच या चित्रपटासाठी भाऊराव क-हाडे यांना पहिला सर्वोत्कष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाला होता. नागराज मंजुळे, भाऊराव क-हाडे हे न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स चे विद्यार्थी असून महेश काळे हाही कॉलेजचा विद्यार्थी आहे.
मराठी चित्रपट स्पर्धेत या सात चित्रपटांचा समावेश
मराठी चित्रपट विभागातील स्पर्धेमध्ये घुमा चित्रपटासह सात चित्रपटांचा समावेश आहे. त्यामध्ये अनंत महादेवन दिगर्शित डॉक्टर रखमाबाई, मंगेश जोशी दिग्दर्शित लथे जोशी , राजेश मापुसकर दिग्दर्शित वेंटिलेटर, अपुर्व साठे दिग्दर्शित एक ते चार बंद, संदिप पाटील दिग्दर्शित दशक्रिया, संदिप सावंत दिग्दशित नदी वाहेत सह महेश रावसाहेब काळे घुमा या चित्रपटांचा समावेश आहे. या विभागातील स्पर्धेत विविध पुरस्कार देण्यात येतात.
Subscribe to:
Posts (Atom)