Wednesday 1 February 2017

दैनिक पुण्यनगरी, दि. ०२/०२/२०१७


दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दि. ०२/०२/२०१७


दै. लोकमत, अहमदनगर. दि. 01-02-2017


दै. दिव्य मराठी, अहमदनगर. दि. 01-02-2017


दै. सार्वमत, अहमदनगर. दि. 01-02-2017


विद्यार्थ्यांनी अनुभवला चित्रपट निर्मितीचा प्रवास January 31, 2017 7:28 pm

विद्यार्थ्यांनी अनुभवला चित्रपट निर्मितीचा प्रवास
January 31, 2017 7:28 pm




दिग्दर्शक महेश काळे यांच्याशी पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संवाद
अहमदनगर : ग्रामीण भागातील असूनही चित्रपट बनविण्याचे स्वप्न कसे साध्य केले ? चित्रपट बनविताना काय अडचणी आल्या ? अडचणींवर मात करत चित्रपट कसा साकारला ?यासह विविध प्रश्नाच्या माध्यमातून कॉलेजिअन्सनी चित्रपट निर्मितीचा प्रवास अनुभवला. निमित्त होते हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील स्नेहसंमलेनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टीम घुमाशी विद्यार्थ्यांशी संवाद या कार्यक्रमाचे. मंगळवारी घुमा टीमने चित्रपटनिर्मितीच्या प्रवासाविषयी विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला. घुमा चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे, निर्माते मदन आढाव, आदिनाथ धायगुडे, सहाय्यक दिग्दर्शक विक्रम शंकपाळे, अविनाश मकासरे, कार्यकारी निर्माते मंगेश जोंधळे, व्यवस्थापक अजय थोरात, नाना मोरे, आदेश आवारे, प्रमोद कसबे या टीमशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, प्राचार्या डॉ. अमरजा रेखी, डॉ. स्मिता भुसे, संमेलन कार्याध्यक्ष डॉ. गिरीष कुलकर्णी, प्रसाद बेडेकर उपस्थित होते.
टीम घुमाशी संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. रुपया लघुपट का करावा वाटला ? घुमा चित्रपटाची कथा कशी सुचली ? निर्माते शोधण्याचा प्रवास कसा होता ? घुमा बनविताना काय अडचणी निर्माण झाल्या ? नवीन कलाकारांना घेउन चित्रपट निर्मितीचे आव्हान कसे पेलले ? विद्यार्थ्यांनी चित्रपट क्षेत्राकडे वळताना काय काळजी घ्यावी ? पिफमध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर काय वाटले ? अशा विविध प्रश्नांचा भडीमार संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी महेश काळे म्हणाले, चित्रपटाची निर्मिती करताना अनेक अडचणी येतात मात्र अडचणी सांगून सुटत नाहीत. प्रत्येक काम करताना अडचणी निर्माण होत असतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतला शोधावे लागते. विद्यार्थी असताना आपण शिक्षण घ्यायचे म्हणून घेतो. अनेकवेळा नोकरीच्या दृष्टीकोनातून पालक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. मुलाची आवड कशात आहेत याचा शोध घेतला जात नाही. मुलाची आवड शोधूनच पालकांनी शिक्षण देणे गरजेचे आहे. फोटोग्राफी करायची म्हणून मास कम्युनिकेशनला अँडमिशन घेतले. मास कम्युनिकेशनच्या अभ्यासक्रमात लघुपट बनविणे अनिवार्य असते. ही आमच्यासाठी एक परीक्षाच असल्याने लघुपट बनविण्याशिवाय पर्याय नसतो. त्यादरम्यान रुपया नावाचा लघुपट बनविला. त्याला राष्ट्रिय पुरस्कार मिळाला. त्यानंतर घुमा चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले. गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेला घुमा पूर्ण झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट ऑडियन्स अँवार्ड मिळाल्याने आनंदात भर पडली. यश मिळण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मिळेल ते काम विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. या कामातून स्वतमधील कसब दाखवता आले पाहिजे. आज आपण आपली संस्कृती जपणे गरजेचे आहे. संस्कृती टिकली तरच आपले अस्तित्व टिकेल असेही काळे म्हणाले.

निर्माते मदन आढाव म्हणाले, चित्रपटाच्या प्रेमाने आम्हाला निर्मितीकडे खेचले. घुमाची चित्रपटाची कथा आवडल्याने माझ्या सहका-यांनी निर्मितीला होकार दिला. महेश काळे यांचा पहिलाच चित्रपट असल्याने मनामध्ये भिती होती. मात्र नगरमधील एका नवीन दिग्दर्शकाला आम्ही पाठींबा दिला. प्रेक्षकांच्याही पसंतीस आम्ही नक्कीच उतरु, असेही सांगितले.
कार्यक्रमाचे निवेदन गिरिष कुलकर्णी, मुग्धा मुळे व प्रसाद बेडेकर यांनी केले.